न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिखली (दि. २५ ऑगस्ट २०२५) :- मुंबई येथे झालेल्या स्टेम नॅशनल चॅलेंज या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत चिखलीच स्वराज भोसले याने आदित्य मुंडे व हर्षद शिंदे या सहकाऱ्यांसह सुवर्णपदक पटकावले. या उल्लेखनीय यशामुळे चिखली व परिसरात आनंदाचे वातावरण आहे.
या कामगिरीबद्दल कुदळवाडी-चिखली ग्रामस्थांच्या वतीने स्वी. सदस्य दिनेश लालचंद यादव यांनी स्वराज भोसले याच्या घरी जाऊन त्याचा सत्कार केला. यावेळी ग्रामस्थ, नातेवाईक व मान्यवर उपस्थित होते.
सत्कार प्रसंगी यादव म्हणाले, “स्वराजसारख्या तरुणाची कामगिरी अभिमानास्पद असून ते भावी पिढीसाठी आदर्श आहे. त्याच्या पुढील वाटचालीसाठी आम्ही सदैव सोबत राहू.”
स्वराज भोसले यानी सांगितले, “हे यश माझ्या टीम, शिक्षक, पालक व ग्रामस्थांचे आहे. देशाचे नाव अधिक उज्ज्वल करण्याचा प्रयत्न करेन.”
सत्कार कार्यक्रमात कुदळवाडी व चिखलीतील नागरिकांनी स्वराज व त्याच्या सहकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.












