- सुरक्षा व सुविधांसाठी शत्रुघ्न काटे यांचे पालिका प्रशासनास निर्देश…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २५ ऑगस्ट २०२५) :- गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विसर्जन घाटांवरील सुरक्षेचा आणि सुविधांचा आढावा भारतीय जनता पार्टी पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी आज घेतला. या पाहणीत आरोग्य विभाग, स्थापत्य विभाग, विद्युत विभागाचे अधिकारी तसेच कर्मचारी उपस्थित होते.
काटे यांनी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सर्वंकष उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. त्यामध्ये घाटांवर CCTV कॅमेरे बसविणे, गणेश भक्तांसाठी आरतीची व्यवस्था, पुरेसे विद्युत दिवे, स्वच्छ व नीटनेटके कृत्रिम हौद, २४ तास रुग्णवाहिकेची सोय, सुरक्षारक्षक तसेच बचाव पथकाची नेमणूक यांचा समावेश होता.
तसेच स्वच्छता, प्रकाशयोजना, गर्दी नियंत्रण, आरोग्यविषयक सुविधा आणि पोलीस बंदोबस्त काटेकोरपणे अंमलात आणण्याचे निर्देश त्यांनी दिले.
या संदर्भात लेखी निवेदन प्रभाग अधिकारी यांना देण्यात आले असून विसर्जन घाटांवरील सर्व सुविधा वेळेत उपलब्ध कराव्यात, जेणेकरून भक्तांना विसर्जन करताना कोणतीही अडचण येऊ नये, अशी मागणी शत्रुघ्न काटे यांनी केली आहे.













