- महसूल मंत्री बावनकुळे यांचा हिरवा कंदील..
 - आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश…
 
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी, (दि. २६ ऑगस्ट २०२५) :- औद्योगिक, कामगार, आयटी व ऑटो हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरात आता भारतीय व्यवस्थापन संस्था (IIM-नागपूर) ची शाखा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकल्पाला हिरवा कंदील देत ७० एकर जागा उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
भाजप आमदार महेश लांडगे यांचा हा ‘‘ड्रीम प्रोजेक्ट’’ असून, मोशी येथील गट क्रमांक ३२५ मधील शासकीय गायरान जमिनीवर आयआयएमची शाखा उभारली जाणार आहे. या निर्णयामुळे शहराच्या लौकीकात भर पडणार असून औद्योगिक विकासाला नवी गती मिळेल. याआधी आमदार लांडगे यांच्या प्रयत्नांतून शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाची शाखा सुरू झाली होती.
आयआयएमची शाखा सुरू झाल्यास रोजगार, संशोधन आणि उद्योजकतेच्या नव्या संधी उपलब्ध होतील. आयआयएमसारखी संस्था सुरू होणे हे शहरासाठी अभिमानाची बाब आहे. – महेश लांडगे, आमदार, भाजपा…
                                                                    
                        		                    
							












