न्यूज पीसीएमसी नेटवर्क
खेड (दि. ०१ सप्टेंबर २०२५) :- वाकी बुद्रुक येथे एका १९ वर्षीय तरुणीने स्वतःचे जीवन संपविल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.
२८ ऑगस्ट रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास फिर्यादी महिलेच्या शेतातील घरामागे ही घटना घडली. संबंधित तरुणीचे आरोपी प्रज्वल राळे (वय १९, रा. राधेवाडी, मूळ रा. कोये, ता. खेड) याच्यासोबत प्रेमसंबंध होते. मात्र, लग्नाचा विषय नाकारला गेल्यामुळे तरुणी मानसिक तणावाखाली गेल्याचे समजते.
तणावाच्या स्थितीत तिने शेतातील कीटकनाशक द्रव सेवन करून आपले जीवन संपवले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पुढील तपास सपोनि आर. बी. पवार करत आहेत.










