- पिंपरी पोलिसांची कारवाई; दोघांवर ‘एफआयआर’ दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी, (सोमवार, दि. २२ सप्टेंबर २०२५) :- पिंपरी परिसरात ऑनलाइन क्रिकेट सट्टेबाजी सुरू असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी कारवाई करून दोन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२(अ) अंतर्गत पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
फिर्यादी पोलीस हवालदार नितीन बाळासाहेब लोखंडे (दरोडा पथक, पिंपरी चिंचवड पोलीस) यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, २० सप्टेंबर २०२५ रोजी रात्री ११.१५ वाजता पिंपरी परिसरात गिरीश मुलचंद इसराणी (वय ३१) आणि विकी मुलचंद इसराणी (वय ३१, रा. रिव्हर रोड, बी ब्लॉक, बाजार पिंपरी) हे दोघे क्रिकेट सट्टेबाजी करताना आढळले.
आरोपींनी गुगल क्रोममध्ये 777exch.com ही वेबसाईट वापरून, आयडी “kak837” व पासवर्ड “king1234” च्या सहाय्याने आशिया कप २०२५ मधील बांग्लादेश विरुद्ध श्रीलंका सामन्यावर ऑनलाइन बेटिंग सुरू केले होते. आरोपी आर्थिक फायद्यासाठी मोबाईलवरून थेट सट्टा घेत होते.
या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात २१ सप्टेंबर रोजी पहाटे ४.२३ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. अद्याप आरोपींना अटक झालेली नसून पुढील तपास मालमत्ता गुन्हे शाखेचे सपोनि बालवडकर करत आहेत.













