न्यूज पीसीएमसी नेटवर्क
निगडी, (रविवार, दि. २१ सप्टेंबर २०२५) :- निगडी परिसरात घरगुती कारणावरून झालेल्या वादातून दोन महिलांनी एका व्यक्तीला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी रोहिदास शिवा आढाव (वय ४६, व्यवसाय – रंगकाम, रा. मिलिंदनगर, निगडी) यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, २० सप्टेंबर २०२५ रोजी रात्री साडेनऊ वाजता घरी व घराजवळ झालेल्या वादाच्या वेळी त्यांच्या भावजय व तिची मोठी बहीण (आरोपी क्रमांक १ व २) यांनी शिवीगाळ करून त्यांना हाताने मारले. त्यानंतर घराजवळील इमारतीच्या भिंतीवर ढकलल्याने फिर्यादीच्या डोक्याला मार लागून दुखापत झाली.
या घटनेनंतर निगडी पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोहवा वीर हे करत आहेत.













