न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ मे २०१९) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त मनपा मुख्य इमारतीतील त्यांच्या प्रतिमेस महापौर राहूल जाधव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, नगरसदस्या आशा धायगुडे – शेंडगे, अनुराधा गोरखे, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, सहाय्यक आयुक्त आशा दुरगुडे, अण्णा बोदडे, सुरक्षा अधिकारी उदय जरांडे आदी उपस्थित होते.
तसेच सांगवी येथील त्यांच्या अर्धकृतीपुतळ्यास महापौर राहूल जाधव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. सांगवी येथे झालेल्या या कार्यक्रमास स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, नगरसदस्या उषा उर्फ माई ढोरे, आशा धायगुडे – शेंडगे, अनुराधा गोरखे, शारदा सोनवणे, नगरसदस्य संतोष कांबळे, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, सहाय्यक आरोग्याधिकारी ज्ञानेश्वर सासवडकर, सामाजिक कार्यकर्ते सुर्यकांत गोफणे, संदेश शेंडगे, संतोष वाघमोडे, बंजरंग गडगे, अभिमन्यु गाडेकर, श्री.तितर, श्री.बारगळ, सचिन सरत, मनोजकुमार मारकडे, अजय दुधभाते, संतोष मदने, विरुवन माने, नवनाथ भिडे, अनिल टकले, काशिनाथ घोडके, अंबादास पडळकर, तसेच सांगली जिल्ह्यातील तालुका, आटपाटी मु. पो. पडकळकर वाडी येथील बिरुबा गजी मंडळाचे सर्व कलाकार उपस्थित होते.















