- सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत वाहतुकीत बदल; पर्यायी मार्गांचा वापर करा…
 
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी, (दि. १५ ऑक्टोबर २०२५) :- व्ही.व्ही.आय.पी. पुणे येथून बावधनमार्गे सिम्बायोसिस कॉलेज, किवळे येथे जाणार असल्याने १६ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत बावधन परिसरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहे.
व्ही.व्ही.आय.पी. यांचा ताफा विवा सर्कल ते भारत इलेक्ट्रॉनिक्स चौक या मार्गावरून जाणार असून या दरम्यान रस्ता दुभाजक नसल्याने सुरक्षेच्या दृष्टीने वाहतूक बंदीची अंमलबजावणी करण्यात आली आहे.
वाहतूक बंदी आणि पर्यायी मार्ग पुढीलप्रमाणे :-
मुळशीकडून विवा सर्कलमार्गे बावधन व पाषाणकडे जाणारी वाहतूक बंद..
पर्यायी मार्ग – एन.सी.सी. ऑफिस, भुगाव रोड समोरून कोथरुड व मुंबईच्या लेनचा वापर करून सीएनजी पंपाजवळील द्रु व्हॅल्यु अंडरपास मार्गे इच्छित स्थळी जाता येईल.
चांदणी चौक सातारा लेन सर्व्हिस रोडमार्गे बावधन, पाषाणकडे जाणारी वाहतूक बंद..
पर्यायी मार्ग – चांदणी चौक सातारा लेन सर्व्हिस रोडने सरळ कोथरुडच्या दिशेने किंवा यु-टर्न घेऊन डीआयवाय शोरूमकडून इच्छित स्थळी जाता येईल.
या अधिसूचनेनुसार, १६ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ ते दुपारी २ दरम्यान सर्व प्रकारच्या वाहनांना या मार्गांवर प्रवेशबंदी राहील. नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करून वाहतुकीत सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस उपायुक्त (वाहतूक) विवेक पाटील यांनी केले आहे.
                                                                    
                        		                    
							












