- सर्जनशीलतेला मिळाले राष्ट्रीय व्यासपीठ…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ ऑक्टोबर २०२५) :- मुंबई येथे आयोजित क्रिएटिव्ह क्वोशंट आर्ट कॉम्पिटिशन (Creative Quotient Art Competition) या राष्ट्रीय कला स्पर्धेत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या १७ शाळांमधील ३४ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत उल्लेखनीय यश मिळवले. “माझे स्वप्न” आणि “एआय नाही करू शकत” या विषयांवर विद्यार्थ्यांनी कल्पकतेने आपली दृष्टी मांडली.
अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त किरणकुमार मोरे, प्रशासन अधिकारी संगीता बांगर आणि नोडल अधिकारी श्रीकांत चौघुले यांच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांनी स्पर्धेत भाग घेतला. स्पर्धेचा उद्देश विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणे आणि त्यांची सर्जनशीलता वाढविणे हा होता.
प्रदीप जांभळे पाटील म्हणाले, “महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थी कला, विज्ञान आणि तंत्रज्ञान या सर्व क्षेत्रात यश मिळवत आहेत.”
सहायक आयुक्त किरणकुमार मोरे यांनी सांगितले, “विद्यार्थ्यांच्या कलात्मक दृष्टीने संपूर्ण शहराचा अभिमान वाढविला आहे.”













