- थकीत मालमत्ता कर न भरल्यास थेट कारवाई; १८ पथकांची शहरभर मोहीम सक्रिय…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १६ ऑक्टोबर २०२५) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर संकलन विभागाने मालमत्ता कर वसुलीसाठी थकबाकीदारांविरुद्ध कठोर मोहीम हाती घेतली असून, आतापर्यंत २७ मालमत्तांची जप्ती करण्यात आली आहे. १८ विभागीय कार्यालयांमार्फत ही मोहीम शहरभर राबवली जात आहे.
अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी सांगितले की, “थकबाकीदारांकडून कर वसुलीसाठी मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू असून, कोणतीही शिथिलता ठेवली जाणार नाही. जप्ती आणि नळकनेक्शन खंडीत करण्याची कारवाई सुरू आहे.”
सहायक आयुक्त अविनाश शिंदे म्हणाले, “थकबाकीदारांना वारंवार सूचना देऊनही कर न भरल्यास जप्ती अपरिहार्य ठरेल. नागरिकांनी तात्काळ थकीत कर भरावा.”
या मोहिमेत आतापर्यंत १२५ थकबाकीदारांनी कर भरून कारवाई टाळली आहे.













