न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ ऑक्टोबर २०२५) :- सम्राट चौक, मैत्री बौद्ध विहार, पिंपरी येथे जुन्या वादातून तीन अल्पवयीनांनी तरुणावर लोखंडी कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे.
या प्रकरणी संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी अरिफ हनीफ शेख (वय २३, रिक्षाचालक) यांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ ऑक्टोबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास ते मित्रांसह रिक्षामध्ये बसलेले असताना तीन विधीसंघर्षित बालकांनी मोटारसायकलवरून येऊन मित्र जावेद (वय १७) याच्यावर कोयत्याने हल्ला केला. डोक्यावर, पाठीवर आणि हातावर वार करून तसेच शिवीगाळ व मारहाण करून त्याला गंभीर जखमी केले.
या तिघांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा आरोप असून, पुढील तपास सपोनि शेटे करत आहेत.













