- दिवाळीनिमीत्त संतोष सौंदणकर यांच्या हस्ते मुलांना फटाके वाटप..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी, (दि. 23 ऑक्टोबर 2023) :- पुणे जिल्हा महाराष्ट्र राज्य विद्युत सनियंत्रण समिती सदस्य तसेच चिंचवड विधानसभा शिवसेना शहर संघटक संतोष सौंदणकर यांच्या मंगल फाउंडेशनच्या वतीने ‘मस्ती की पाठशाला’ येथे दिवाळी साजरी करण्यात आली. या उपक्रमात संतोष सौंदणकर यांच्या हस्ते मुलांना फटाके वाटप करण्यात आले. फाउंडेशनचे हे सलग पाचवे वर्ष आहे.
सौंदणकर यांनी या प्रसंगी तेथील गुरुजनांशी आणि मुलांशी संवाद साधला. त्यांनी सांगितले की, “समाजातील प्रत्येक घटकाने अशा मुलांसोबत सण साजरा करावा, कारण त्यांचा आनंदच आपल्याला खरी दिवाळी दाखवतो.” त्यांनी मुलांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरित केले. सामाजिक बांधिलकी जपत दिवाळीचा आनंद सर्वांपर्यंत पोहोचविण्याचा उद्देश या उपक्रमामागे होता.
कार्यक्रमात फिरोज खान, सतिश पोपळे, गणेश ओगले, अक्षय भोसले, सुमित कांबळे, रूबान शेख आणि सुनील ढमाले हे मान्यवर उपस्थित होते.
फटाक्यांचा आवाज आणि मुलांच्या हास्याने परिसर दुमदुमून गेला. आनंद, उत्साह आणि सामाजिक जाणीवेची सांगड घालणारा हा उपक्रम दिवाळीच्या सणाला विशेष अर्थ देणारा ठरला.













