- निवडणुकीआधीच प्रभाग क्रमांक २७ मध्ये भाजपच्या विकासकामांचा झंझावात..
- भाजप पक्षश्रेष्ठींचा नखाते यांच्या कार्यशैलीवर ठाम विश्वास…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
रहाटणी (दि. 27 ऑक्टोबर 2025) :- पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकांची चाहूल लागल्याने प्रभाग क्रमांक २७ रहाटणी परिसरात राजकीय हालचालींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवार गणेश शिवराम नखाते यांनी प्रचाराच्या आघाडीवर वेगाने पाऊल टाकले असून, दिवाळीच्या निमित्ताने त्यांनी घराघरात जाऊन नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या या “घराघरात दिवाळी शुभेच्छा” मोहिमेला प्रभागातील नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
नखाते हे सध्या प्रभागातील एकमेव उमेदवार आहेत जे निवडणुकीच्या अगोदरच सक्रिय प्रचारात उतरले आहेत. त्यांनी नागरिकांना भेटवस्तूरूपात दिवाळी शुभेच्छा देत संवाद साधला आहे. यामुळे प्रभागात त्यांची लोकप्रियता आणखी वाढताना दिसत आहे. इतर संभाव्य उमेदवार अजूनही निवडणुकीची तारीख जाहीर होण्याची प्रतीक्षा करत असताना, नखाते यांनी मात्र मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.
गणेश शिवराम नखाते हे गेल्या अनेक वर्षांपासून रहाटणी परिसरातील विविध सामाजिक आणि नागरी प्रश्नांवर काम करत आहेत. त्यांच्या कार्यतत्परतेमुळे आणि शांत स्वभावामुळे नागरिकांचा त्यांच्यावर ठाम विश्वास निर्माण झाला आहे. नखाते हे आमदारांच्या निकटवर्तीय मानले जातात, त्यामुळे पक्षाकडून त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता अधिक असल्याचे स्थानिकांमध्ये बोलले जाते.
प्रभाग क्रमांक २७ मध्ये भाजपचे वर्चस्व कायम असून, मागील निवडणुकीत संपूर्ण पॅनल भाजपकडून निवडून आले होते. त्यामुळे यावेळीही इच्छुकांची संख्या लक्षणीय आहे. तरीसुद्धा नखाते यांनी आत्मविश्वासाने सांगितले की, “गेल्या अनेक वर्षांपासून मी प्रभागातील समस्यांवर सातत्याने काम केले आहे. माझ्या समाजसेवेची दखल वरिष्ठ नेते नक्की घेतील आणि मी नगरसेवक म्हणून निवडून येईन,” असा दृढ विश्वास त्यांनी व्यक्त केला.
रहाटणी परिसरातील नागरिकांच्या अपेक्षा आणि विश्वासाच्या जोरावर गणेश नखाते यांचा प्रचार अधिक जोमात सुरू असून, येणाऱ्या निवडणुकीत त्यांचा उमेदवारीसाठीचा दावा अधिक बळकट झाला आहे.













