- काळेवाडी पोलिस ठाण्यात वाहनचालकावर गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
रहाटणी (दि. २७ ऑक्टोबर २०२५) :- रहाटणी येथे रस्ता ओलांडत असताना एका वृद्ध व्यक्तीस मोटारसायकलने जोराची धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला असून या प्रकरणी काळेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी विकास गोविंद पाटील (वय ५०, रहाटणी, पुणे) यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे वडील गोविंद बाबुराव पाटील (वय ७३) हे ७ ऑक्टोबर २०२५ रोजी संध्याकाळी साडेचार वाजता मारुती सुझुकी मोटारसायकल शोरूम, रहाटणी येथे रस्ता ओलांडत असताना, योगेश माकोणे (रा. महाळुंगे, बालेवाडी) या युवकाने त्याच्या पल्सर मोटारसायकल हयगयीने आणि बेदरकारपणे चालवून वृद्धांना जोराची धडक दिली.
या अपघातात गंभीर जखमी झालेल्या पाटील यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पुढील तपास पोउपनि सूर्यवंशी हे करीत आहेत.













