- पवना नदी किनारी २५ ते २८ ऑक्टोबरदरम्यान धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन..
- भाविकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. 24 ऑक्टोबर 2025) :- यंदाही पिंपरी-चिंचवड शहरात मोठ्या उत्साहात हनुमान मित्र मंडळाच्या वतीने पारंपरिक छठ पूजेचा भव्य सोहळा चिंचवडगावातील पवना नदी घाटावर (हॉटेल रिव्हर ह्यु, गणपती विसर्जन घाट) आयोजित करण्यात आला आहे.
या सोहळ्याकरिता आवश्यक परवानग्या आणि सुविधा वेळेत उपलब्ध कराव्यात यासाठी हनुमान मित्र मंडळाचे कार्याध्यक्ष विजय आर गुप्ता यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त, पोलीस आयुक्त, चिंचवड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, महापालिकेचे क्षेत्रीय अधिकारी, आरोग्य अधिकारी तसेच विद्युत विभाग यांना नुकतेच निवेदन दिले आहे.
नुकतीच गुप्ता यांनी शिष्टमंडळासोबत पवना नदी घाट परिसराची पाहणी केली. निवेदनात घाट परिसर स्वच्छ ठेवणे, सार्वजनिक दिवाबत्ती व फोकस लावणे, किटकनाशक फवारणी करणे, नदीपात्रात आवश्यकतेनुसार पाणी सोडणे, वाहतूक व बंदोबस्ताची व्यवस्था करणे अशा मागण्यांचा समावेश आहे.
या कार्यक्रमास शुक्रवार, दि. २५ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ३.०० वाजता प्रारंभ होऊन सोमवार, दि. २८ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता (सूर्योदय अर्घ्याने) सांगता होणार आहे.
या पारंपरिक सोहळ्यात उत्तर भारतीय समाजातील महिला, पुरुष तसेच बाल-गोपाल मोठ्या संख्येने सहभागी होणार असून सूर्यास्त व सूर्योदयाच्या वेळी पाण्यात उभे राहून सूर्यदेवतेची पूजा-अर्चना केली जाणार आहे. धार्मिक विधीं बरोबरच सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर गुप्ता यांनी विविध शासकीय व मनपाच्या अधिकाऱ्यांकडे निवेदने सादर केली आहेत.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष जितेंद्र के. गुप्ता, कार्याध्यक्ष शशिकांत श्रीवास्तव (पूर्वाचल विकास मंच), छठपुजा समिती सदस्य जितेंद्र गुप्ता, उपाध्यक्ष देवानंद गुप्ता, तसेच कार्याध्यक्ष विजय आर. गुप्ताफिल्म प्रोड्युसर विकास मिश्रा, संस्थापक जयप्रकाश नारायणप्रसाद गुप्ता, सिध्दांत गुप्ता, वकील गुप्ता,
विकास मिश्रा अध्यक्ष, पूर्वाचल विकास मंच, मुन्ना डी. गुप्ता, अनिल एस. गुप्ता, उमा के. गुप्ता, सचितानंद मिश्रा, टी. एन. तिवारी,
सुभाष एम. गुप्ता, श्यामसुंदर गुप्ता, मदन आर. गुप्ता, पप्पु डी. गुप्ता, सुजित एम. गुप्ता, शंकर गुप्ता, शंभू गुप्ता, रमेश गुप्ता, भोला बी. गुप्ता, मनोज आर. गुप्ता, राजेश जे. गुप्ता, विनोद गुप्ता, संतोष गुप्ता, संजिव आर. गुप्ता, प्रिंस गुप्ता, विनोद जे. गुप्ता, प्रविण एम. गुप्ता, राजकुमार गुप्ता, नरेंद्र जि. गुप्ता, रमेश गुप्ता आदी पदाधिकारी नियोजनात सहभागी आहेत.
हनुमान मित्र मंडळाच्या वतीने विजय आर. गुप्ता यांनी सांगितले की, “छठ पूजा ही उत्तर भारतीय समाजाची श्रद्धेची पर्वणी आहे. पवना नदीकिनारी दरवर्षी अत्यंत भावपूर्ण वातावरणात हा सोहळा पार पडतो. या सोहळ्यास भक्त-भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन विजय गुप्ता यांनी केले आहे.
असा आहे कार्यक्रम…
१) बडकी छठ (संध्या अर्ध) (घाटावरती) :- २७ ऑक्टोबर २०२५ (सोमवार) सुर्यास्त ६.०४,
२) पारण (प्रातः अर्ध) (घाटावरती) :- २८ ऑक्टोबर २०२५ (मंगळवार) सुर्योदय ६.३३












