- उप आयुक्त पंकज पाटील, सचिन पवार, प्रदीप ठेंगल यांच्या जबाबदारीत वाढ…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी, (दि. २७ ऑक्टोबर २०२५) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने आयुक्त तथा प्रशासक यांच्या आदेशानुसार विविध विभागांतील अधिकाऱ्यांचे खाते बदल आणि अतिरिक्त कार्यभाराची जबाबदारी त्यांचेवर सोपविण्यात आली आहे.
महापालिकेमध्ये निवडणूक व जनगणना आणि कर आकारणी व संकलन विभाग अशा दोन विभागाचे कार्यभार सांभाळणारे सहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे यांची बदली नागपूर येथे बदली झाली. यामुळे रिक्त झालेल्या कर आकारणी व संकलन विभागाचा अतिरिक्त कार्यभार क्रीडा विभागाचे उप आयुक्त पंकज पाटील यांच्याकडे (क्रीडा विभागासह) सोपविण्यात आला आहे.
तर आरोग्य विभाग आणि स्वच्छ भारत अभियान विभागाचा कार्यभार पाहणारे उप आयुक्त सचिन पवार यांना निवडणूक व जनगणना विभागाचा कार्यभार देण्यात आला आहे. दरम्यान, नागरी सुविधा केंद्राचे उप आयुक्त प्रदीप ठेंगल यांच्याकडे आरोग्य विभाग आणि स्वच्छ भारत अभियानचा (नागरी सुविधा केंद्रासह ) अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.
त्यामुळे महानगरपालिकेच्या प्रशासकीय कार्यात गती, समन्वय आणि कार्यक्षमतेसाठी करण्यात आलेल्या या फेरबदलामुळे विविध विभागांमधील कामकाज अधिक प्रभावीपणे पार पाडण्यास मदत होणार आहे.













