- चिखली पोलिसांची कारवाई; तडीपार आरोपीचाही समावेश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिखली (दि. २९ ऑक्टोबर २०२५) :- चिखली परिसरात रिक्षाचालकाकडून दरमहा दोन हजार रुपयांची खंडणी मागून न दिल्यास लोखंडी कोयत्याने हल्ला करणाऱ्या टोळीविरुद्ध चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
फिर्यादी आकाश दिलीप भुसारे (२५, रिक्षाचालक) यांना आरोपी प्रशांत तुपे आणि सौरभ तुपे यांनी खोटे सांगून रिक्षा बोलावली. त्यानंतर दर महिन्याला खंडणी मागून ८०० रुपये घेतले. उर्वरित पैसे न दिल्याने आरोपी प्रशांत तुपेने लोखंडी कोयत्याने फिर्यादीच्या डोक्यात मारून जखमी केले. जमलेल्या नागरिकांना धमक्या देत परिसरात दहशत माजवली.
यानंतर आरोपी कुणाल भंडारी, अक्षय जाधव आणि निखील गाडेकर यांनीही फोनवरून व समक्ष फिर्यादीला तसेच त्याच्या ओळखीच्या व्यक्तींना जिवे ठार मारण्याच्या धमक्या दिल्या.
पुढील तपास पो.उपनि. मोगले करत आहेत.













