न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मोशी, (दि. २९ ऑक्टोबर २०२५) :- शिवाजीनगर येथील बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरी लावून देतो असे आमिष दाखवून एकूण ५ लाख १५ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी दीपक रमेश शिंदे (रा. बेलपिंपळगाव, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी सुहास सुधाकर कांबळे (३९, रा. प्राधिकरण, मोशी) आणि त्यांच्या नातेवाईकांकडून आरोपीने “बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरी लावतो” असे सांगून ई-मेल व व्हॉट्सअॅप संदेशाद्वारे संपर्क साधला. आरोपीने बनावट मेल आयडीवरून पत्रव्यवहार करून बँकेचे बनावट फॉर्म पाठवले आणि विविध कारणांनी ५ लाखांहून अधिक रक्कम घेतली.
पैसे घेतल्यानंतर आरोपीने मोबाईलवर स्टेटस ठेवून फोन बंद केला. या प्रकरणाचा तपास पो.उपनि. जोनापल्ले करत आहेत.













