न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चाकण (दि. ३० ऑक्टोबर २०२५) :- चाकण तळेगाव रोडवरील मयूर हॉटेल बार अँड रेस्टॉरंट येथे हॉटेल मॅनेजरवर लोखंडी रॉडने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली.
हा प्रकार दि. २८ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता घडला असून, पोलिसांनी गुन्हा दाखल करून एकाला अटक केली आहे.
फिर्यादी दयानंद साधू शेट्टी (वय ४२) हे हॉटेल मॅनेजर आहेत. आरोपी गणेश नानेकर (वय ४४) आणि एक विधीसंघर्षित बालक यांनी हॉटेलमध्ये घुसून शिवीगाळ, धमक्या आणि मारहाण केली. नानेकरने हातातील लोखंडी रॉडने फिर्यादीच्या डोक्यावर व हातावर वार करून त्यांना गंभीर जखमी केले, तर दोन कर्मचारी – कॅशियर शेट्टी आणि वेटर यादव – यांनाही मारहाण केली.
घटनेनंतर आरोपींनी ग्राहकांना धमकावून हॉटेलमध्ये दहशत माजवली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कोरडे करीत आहेत.













