न्यूज पीसीएमसी नेटवर्क
रावेत (दि. ३० ऑक्टोबर २०२५) :- पिंपरी-चिंचवड परिसरातील पुनावळे येथे तब्बल २ कोटी १८ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी रावेत पोलिस ठाण्यात सुशांत सुभाष पेटकर (रा. रावेत) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी श्रीकांत कुंडलिक घोडेकर (वय ३७) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपीने ऑगस्ट २०२३ ते डिसेंबर २०२३ दरम्यान “शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास प्रति महिना १५ टक्के परतावा मिळेल” असे सांगून फिर्यादीकडून २.१८ कोटी रुपये घेतले. सुरुवातीचे दोन महिने ४० लाख रुपये परत केले, मात्र उर्वरित रक्कम गुंतवणुकीत न वापरता आपल्या नातेवाईकांच्या खात्यावर वर्ग करून फसवणूक केली.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपी अद्याप फरार असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक खैरे, रावेत पोलीस ठाणे हे करत आहेत.













