- चोविसावाडी केंद्रात घडली घटना; सहकाऱ्यांमध्ये शोककळा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ ऑक्टोबर २०२५) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या चोविसावाडी अग्निशमन केंद्रातील एका जवानाचा व्यायाम करत असताना मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी (दि. २८) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली.
मृत जवानाचे नाव राजेश रामभाऊ राऊत (वय ३१, रा. च-होली) असे आहे. नेहमीप्रमाणे मंगळवारी ते व्यायाम करत असताना अचानक अस्वस्थ झाले. “थोडावेळ आराम करतो” असे सांगून ते खाली आले. काही वेळानंतर सहकाऱ्यांनी पाहिले असता ते बेशुद्ध अवस्थेत आढळले.
घटनेची माहिती मिळताच त्यांना तत्काळ रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे अग्निशमन दलात तसेच सहकाऱ्यांमध्ये शोककळा पसरली आहे. दिघी पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.













