- आठवड्याभरात होणार होतं मुलाच लग्न…
 
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मोहननगर, चिंचवड (दि. ३१ ऑक्टोबर २०२५) :- पिंपरी चिंचवड शहरातील मोहननगर परिसरातील दुर्गा रेसिडेन्सी येथे राहणाऱ्या एका महिलेचा पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू झाला.
मृत महिलेचे नाव आशा संजय गवळी (वय ५२) असे असून, त्या सकाळी पिण्याचे पाणी भरण्यासाठी टाकीवर गेल्या असता संतुलन बिघडल्याने त्या टाकीत पडल्या. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन त्यांचा मृतदेह बाहेर काढला. शवविच्छेदनासाठी वायसीएम रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, त्यांच्या मुलाचे लग्न येत्या ४ नोव्हेंबर रोजी होणार होते. मात्र लग्नाच्या काहीच दिवसांपूर्वी घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे गवळी कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
                                                                    
                        		                    
							












