- मारुती जगताप पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाचे नवे उपायुक्त…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ नोव्हेंबर २०२५) :- पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील उपायुक्त बापू बांगर यांची बदली करण्यात आली असून त्यांची नियुक्ती अमरावती येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस अधीक्षकपदी झाली आहे. राज्य शासनाचे सहसचिव व्यंकटेश भट यांनी या संदर्भातील आदेश जारी केले आहेत.
बांगर हे पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडत होते. त्यांच्या कार्यकाळात विविध गुन्हेगारी कारवायांवर नियंत्रण ठेवण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
दरम्यान, त्यांच्या जागी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक मारुती जगताप यांची पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या बदल्यांमुळे दोन्ही विभागांतील प्रशासकीय फेरबदलांना वेग आला असून, नव्या अधिकाऱ्यांकडून कार्यक्षमतेची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.













