न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ नोव्हेंबर २०२५) :- दरवर्षीप्रमाणे यंदाही कार्तिकी एकादशी २०२५ निमित्त, वैष्णव चॅरिटेबल अँड मेडिकल ट्रस्ट, मुंबई यांच्या वतीने पंढरपूर येथे भाविकांच्या आरोग्य सेवेकरिता वैद्यकीय सेवा मोहीम आयोजित करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत ट्रस्टचे डॉक्टर आणि सहकारी सदस्यांची वैद्यकीय टीम खंडोबा मंदिर, ट्रान्सपोर्ट नगर, निगडी प्राधिकरण येथून पंढरपूरकडे रवाना झाली.
या वैद्यकीय सेवाकार्यात डॉ. रामनाथ बच्छाव, डॉ. वसंतराव गोरडे, डॉ. रामेश्वर मोरे, डॉ. नरोटे, डॉ. प्रशांत जावळे, डॉ. खरात, प्रकाश सातव, संतोष नलवडे, अमेय तांबोळी, देवेंद्र चव्हाण, महेंद्र नलवडे, अंकुश नलवडे, अरुण महाजन आणि चंद्रकांत चौबळ ही वैद्यकीय टीम पंढरपूर येथे येणाऱ्या भाविकांसाठी विविध आरोग्य तपासण्या, उपचार तसेच विनामूल्य औषधोपचार सुविधा उपलब्ध करून देणार आहे.
निगडी येथून या वैद्यकीय टीमला श्रीराम नलवडे, ह.भ.प. देवराम कोठारे तथा प्रदीप तासगांवकर यांच्या हस्ते शुभेच्छा देऊन निरोप देण्यात आला. वैष्णव चॅरिटेबल अँड मेडिकल ट्रस्टतर्फे सर्व डॉक्टर आणि सेवाभावी सहकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन तसेच त्यांच्या सेवाभावाला हार्दिक शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या आहेत.













