- संत तुकारामनगर पोलीस ठाण्यातील घटना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ नोव्हेंबर २०२५) :- संत तुकारामनगर पोलिस ठाण्यात महिलांनी महिला पोलीसालाच मारहाण करून शासकीय कामात अडथळा आणल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून एक आरोपीला अटक करण्यात आली आहे.
शुक्रवारी दुपारी ३ वाजता ही घटना घडली. एका मुलीने आपल्या आई आणि मावशीवर तिच्या इच्छेविरुद्ध वयाने १० वर्षांनी मोठ्या व्यक्तीशी जबरदस्ती लग्न लावून देण्याचा आरोप करत पोलिस ठाण्यात तक्रार दिली. डे-ऑफिसर सपोनि अतुल शेटे यांनी तक्रारीनंतर मुलीची आई (आरोपी क्र. १) आणि मावशी (आरोपी क्र. २) यांना ठाण्यात बोलावले.
त्यावेळी दोन्ही आरोपी महिलांनी ठाण्यातच मुलीस मारहाण करून शिवीगाळ केली. फिर्यादी महिला पोलीस हस्तक्षेप करत असताना दोघींनी त्यांच्या गणवेशाची कॉलर पकडून मारहाण केली, धक्काबुक्की करत ठाण्यात गोंधळ घातला. या प्रकरणी संत तुकारामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून तपास पोउपनि आटवे करत आहेत.













