- लोखंडी झाऱ्याने आचाऱ्यावर हल्ला; दोनजण अटकेत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ नोव्हेंबर २०२५) :- तळेगाव चौकातील चौधरी हॉटेलमध्ये दारू पिण्यास मनाई केल्याचा राग मनात धरून सहा जणांनी हॉटेलमध्ये घुसून आचारीवर हल्ला करून तोडफोड केल्याची घटना घडली. या प्रकरणी चाकण पोलिसांनी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
घटनेत बलदेवकुमार सुभाष चंदेर (वय २४, मूळ गुवाहाटी, जम्मू-काश्मीर) हा आचारी जखमी झाला आहे. गुरुवारी मध्यरात्री आरोपी ओंकार बिसणारे, दिनेश दिवे, अतुल अर्जुन तांबे, टिल्या घोडके, रजत सय्यद आणि मयुर तरडे यांनी हॉटेलमध्ये घुसून मारहाण केली. आरोपींनी दगड व लोखंडी झाऱ्याने हल्ला करत हॉटेलमधील साहित्यांची तोडफोड केली तसेच हॉटेल मालकाकडे महिन्याला चार हजार रुपयांची मागणी केली.
या घटनेनंतर चाकण पोलिसांनी भारतीय दंड संहिता इत्यादी कलमान्वये गुन्हा दाखल केला असून, आरोपी क्रमांक ३ अतुल तांबे आणि ५ रजत सय्यद यांना अटक करण्यात आली आहे. तपास सपोनि पाटील करीत आहेत.













