- बारामती आणि पुरंदर तालुके पूर्णपणे प्राधिकरणाशी जोडले जाणार?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २ नोव्हेंबर २०२५) :- पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) कार्यक्षेत्रात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या प्राधिकरणाखाली ६९७ गावे आहेत, मात्र लवकरच १६३ नव्या गावांचा समावेश करण्यात येणार आहे. यात बारामती आणि पुरंदर हे दोन्ही तालुके संपूर्णपणे पीएमआरडीएच्या अखत्यारीत येतील.
या विस्तारानंतर प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रात सुमारे ९०० गावे समाविष्ट होतील. या प्रस्तावाला शासनाची मंजुरी प्रलंबित असून, लवकरच अंतिम निर्णय अपेक्षित आहे. सध्या पीएमआरडीएच्या हद्दीत पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांसह मावळ, मुळशी, हवेली, भोर, शिरुर, दौंड, खेड, वेल्हे आणि पुरंदर या तालुक्यांतील काही गावे आहेत.
बारामती तालुक्यातील ११३ महसुली गावे आणि पुरंदर तालुक्यातील सुमारे ५० अपूर्ण गावे नव्याने समाविष्ट करण्याचा प्रस्ताव आहे. या विस्तारामुळे प्राधिकरणावर प्रशासकीय जबाबदारी वाढणार असली तरी, विकास नियोजन आणि बांधकाम परवानग्यांची प्रक्रिया अधिक सुसंगत होईल.
- “गावांची संख्या वाढविण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला असून, निर्णय झाल्यानंतर कार्यवाही सुरू होईल,”
— डॉ. योगेश म्हसे, आयुक्त, पीएमआरडीए…











