- जिल्हा निवडणूक संचालन समिती जाहीर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ नोव्हेंबर २०२५) :- आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत भाजपाची संपूर्ण निवडणूक यंत्रणा अधिक शक्तिशाली करण्यासाठी प्रदेश भाजपाने आमदार अमित गोरखे यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. पिंपरी-चिंचवड जिल्हा निवडणूक संचालन समितीच्या संयोजकपदी गोरखे यांच्या निवडीची अधिकृत घोषणा करण्यात आली असून, पक्षातील ही अत्यंत महत्त्वाची भूमिका मानली जाते.
समितीच्या सहसंयोजकपदी संघटन सरचिटणीस मोरेश्वर शेडगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक कालावधीत उमेदवारांची मुलाखत, उमेदवार चयन, प्रचाराची रणनीती, व्यवस्थापन आणि संपूर्ण निवडणूक प्रक्रियेचे नियोजन यासाठी जिल्हा संचालन समिती केंद्रस्थानी भूमिका बजावते. या सर्व जबाबदाऱ्यांसाठी गोरखे यांच्या नावावर विश्वास टाकत भाजपाने शहरात नवे नेतृत्वाचे सूत्र हाती दिले आहे.
समितीमध्ये विविध महत्त्वाच्या पदांसाठी पुढील नियुक्त्या करण्यात आल्या आहेत…
जाहीरनामा प्रमुख : अमोल देशपांडे
महा-युती समन्वयक : सदाशिव खाडे
प्रचार यंत्रणा समन्वयक : विजय फुगे
निवडणूक आयोग संपर्क प्रमुख : राजेश पिल्ले
विरोधकांसाठी आरोपपत्र प्रमुख : विलास मडीगेरी
सामाजिक संपर्क प्रमुख : विकास डोळस
विशेष संपर्क प्रमुख : संजय मंगोडेकर
युवा संपर्क प्रमुख : दिनेश यादव
महिला संपर्क प्रमुख : वैशाली खाडे
मिडिया समन्वयक : संजय पटनी
लाभार्थी समन्वयक : गोपाळ माळेकर
यांच्यासह राजू दुर्गे, सत्यनारायण चांडक, मधुकर बच्चे, संजय परळीकर, गोरक्षनाथ झोळ, राजू मासुळकर, गुलाब बनकर, अमेय देशपांडे, सचिन राऊत आणि भूषण जोशी या पदाधिकाऱ्यांनाही समितीत जबाबदारी देण्यात आली आहे. आमदार अमित गोरखे यांच्या निवडीचे पक्ष कार्यकर्त्यांसोबतच संघ वर्तुळातही स्वागत होत असून, महापालिका निवडणुकीत भाजपाला मजबूत गती देणारा हा निर्णय असल्याची प्रतिक्रिया शहरभरात उमटत आहे.










