- राष्ट्रवादीच्या अश्विनी तापकीर यांची प्रचाराला जोरदार सुरुवात..
- महिला बचत गटांपासून ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमापर्यंत केवळ अश्विनी तापकीरांचाच बोलबाला..
- वाढदिवसानिमित्त प्रभागात जोरदार शक्तीप्रदर्शन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ नोव्हेंबर २०२५) :- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे आरक्षण जाहीर होताच शहरातील सर्वच संभाव्य उमेदवारांनी मोर्चा मतदारांकडे वळवला आहे. प्रभाग २७ रहाटणीमध्येही राजकीय हालचाली वेगाने सुरू असून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या इच्छुक उमेदवार अश्विनी चंद्रकांत तापकीर यांनी प्रचाराचा सुरुवातीपासूनच जोरदार धडाका लावला आहे.
अश्विनी तापकीर प्रभागात अनेक वर्षांपासून सक्रिय असून महिला बचत गटांच्या माध्यमातून त्यांनी घराघरात पोहोच निर्माण केली आहे. लाडकी बहिणी योजनेसाठी हजारो महिलांचे नोंदणी अर्ज भरून देत त्यांनी प्रभागातील महिलांना मोठा आधार दिला. त्यांच्या प्रयत्नांमुळे अनेक महिला या योजनेच्या लाभार्थी ठरल्या आहेत. याशिवाय प्रभागातील दैनंदिन अडचणी सोडवण्यातही त्यांनी नागरिकांना सातत्याने मदत केली आहे. त्यांचा मनमिळावू आणि शांत स्वभाव मतदारांना आकर्षित करत असून पक्षश्रेष्ठी त्यांच्यावर विश्वास ठेवतील, असा त्यांना ठाम विश्वास आहे.
दरम्यान, त्यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभागातील महिलांसाठी आनंदाचे क्षण निर्माण करण्यासाठी ‘होम मिनिस्टर’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम २२ नोव्हेंबर रोजी थोपटे बँक्वेट हॉल, रहाटणी येथे होणार असून विजेत्यांसाठी टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन, टॅबलेट, मोबाईल फोन, मानाची पैठणी, विशेष आकर्षण – लकी ड्रॉमधील ५ महिलांना हेलिकॉप्टर राईड अशा आकर्षक बक्षिसांची रेलचेल आहे.
अश्विनी तापकीर यांनी प्रभागातील सर्व महिलांना या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले असून “स्त्रियांनी काही क्षण आनंदात घालवावेत” अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
दरम्यान रहाटणीत सध्या निवडणुकीची रंगत वाढली असून अश्विनी तापकीर यांच्या जनसंपर्क मोहिमेमुळे या प्रभागात चांगली चुरस निर्माण झाली आहे.











