- न्यायालयाकडून आरोपीला सशर्त जामीन मंजूर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ डिसेंबर २०२५) :- विवाहित महिलेला लग्नाचे आमिष देऊन शारीरिक संबध प्रस्थापित केल्याच्या गुन्ह्यात आरोपीला सत्र न्यायाधीश एस.एस.सस्ते न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. शिवाजी दाते असे जामीन मंजूर झालेल्या आरोपीचे नाव आहे.
आरोपीच्या वतीने ॲड. संजय भळगट, ॲड. श्रीकांत मोटे, ॲड. प्रथमेश दौंडकर यांनी काम पाहिले व त्यांना ॲड. प्रगती दिघे यांनी सहकार्य केले. या प्रकरणी आरोपीवर (दि. २० ऑक्टोबर २०२५) रोजी भोसरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. विवाहित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी शारीरिक संबंध करण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला.
आरोपीच्या वकिलांनी युक्तिवाद करत कोर्टाला पटवून दिले की सदर दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. आरोपीने कोणत्याही प्रकारचे आमिष महिलेला दिले नव्हते. प्रेमसंबंधात झालेल्या वादातून आरोपीला खोट्या गुन्ह्यात अडवण्यात आलेले आहे. आरोपीने कोणताही गुन्हा केलेला नाही. आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपीस जामीन मंजूर केला.












