- प्रचारादरम्यान महिला मतदारांचा ठाम पाठिंबा..
- प्रभागात परिवर्तनाची लाट; प्रस्थापितांनी रुपालीताईंच्या हायटेक प्रचाराचा घेतलाय धसका…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिखली (दि. १९ डिसेंबर २०२५) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १ (चिखली गावठाण, मोरे वस्ती, सोनवणे वस्ती) येथे भाजपच्या सर्वसाधारण गटातील महिला उमेदवार रुपालीताई पांडाभाऊ साने यांच्या प्रचाराने चांगलीच आघाडी घेतली आहे. प्रचाराच्या प्रत्येक फेरीत नागरिकांचा, विशेषतः महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून प्रभागात परिवर्तनाची लाट निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे.
रुपालीताई साने यांच्या प्रचाराला आमदार महेश दादा लांडगे यांचे मार्गदर्शन लाभल्याने कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. प्रचारादरम्यान स्थानिक नागरिकांकडून विविध समस्या, अपेक्षा आणि विकासाबाबतच्या सूचना रुपालीताई ऐकून घेत असून, त्या सोडवण्याचा विश्वासही नागरिकांना देत आहेत.
यंदा प्रभागात महिलांच्या न्याय व हक्कासाठी यावेळी मतदान फक्त रूपालीताईनाच असा निर्धार नवदुर्गा सखी मंचच्या महिलांनी केला असून, “रुपालीताईंना महापालिकेत पाठवायचेच” असा निश्चय त्यांनी जाहीरपणे व्यक्त केला आहे. प्रचारादरम्यान महिलांकडून जागोजागी औक्षण करून, पुष्पवृष्टी व सत्कार करत रुपालीताईंचे स्वागत केले जात आहे. या स्वागतामुळे प्रचाराला अधिकच गती मिळत असून महिला शक्ती एकवटल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
घराघरांतून, वस्तीपातळीवर सुरू असलेल्या संवादामुळे रुपालीताई साने यांचा जनसंपर्क वाढत असून, त्यांचा प्रचार दिवसेंदिवस मुसंडी मारत आहे. विकास, महिलांचे प्रश्न, मूलभूत सुविधा आणि सुरक्षितता या मुद्द्यांवर ठोस भूमिका मांडत रुपालीताई साने प्रभागातील मतदारांचा विश्वास संपादन करत असल्याचे चित्र सध्या प्रभाग क्रमांक १ मध्ये पाहायला मिळत आहे.












