न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चाकण (दि. २६ ऑक्टोबर २०२६) :- घरात काय तमाशा चाललाय, असे म्हणत शिवीगाळ करणाऱ्या वडिलांना शिवीगाळ करू नका, असे सांगितल्याने संतापलेल्या वडिलांनी मुलगी आणि तिची बहीण यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच दोघींना दातांनी चावा घेऊन जखमी केल्याची घटना चाकण येथील आगरकरवाडीजवळ घडली.
ही घटना शनिवार, दि. २४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री नऊच्या सुमारास घडली. याप्रकरणी महिला फिर्यादीने उत्तर चाकण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन सदाशिव देशमुख (वय ४७, रा. आगरकरवाडी रोड, चाकण) यांनी फिर्यादी आणि तिची बहीण गौरी यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच फिर्यादीच्या डाव्या पायाच्या गुडघ्याजवळ, तर गौरीच्या डाव्या हाताच्या पंजावर मधल्या बोटाजवळ आणि उजव्या पायाच्या पोटरीवर दातांनी चावा घेऊन जखमी केले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास श्रेणी पोलीस उपनिरीक्षक बुरुड करीत आहेत.


















