- MACCIA चे अध्यक्ष रविंद्र माणगावे यांचे उद्योजकांना मार्गदर्शन…
अशोक लोखंडे :- संपादक व प्रतिनिधी
न्युज पीसीएमसी नेटवर्क
चाकण (दि. २१ डिसेंबर २०२५):- एकच ध्यास उद्योजकता विकास या उक्तीप्रमाणे अनेक गोष्टींवर चाकण MIDC उद्योजक संघटना काम करत असते. त्यातीलच एक भाग गेली 5 वर्षे चाकण MIDC उद्योजक संघटना दर महिन्याच्या तिसऱ्या शुक्रवारी अव्यहातपणे उद्योजकांच्या विकासासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील नामवंत व्यक्ती व संस्था यांना सेमिनार घेण्यासाठी आमंत्रित करीत असते. याचा प्रत्यक्षरीत्या फायदा हा उद्योजकांना होत असतो.
त्याप्रमाणे 19 डिसेंबर 2025 शुक्रवार रोजी चाकण MIDC उद्योजक संघटनेने हॉटेल स्प्री पिंपरी चिंचवड मध्ये ऊद्योजकता विकास या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व चेंबर ऑफ कॉमर्स यांची शिखर संस्था असलेल्या MACCIA चे अध्यक्ष रविंद्र माणगावे ( अध्यक्ष – महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड एग्रीकल्चर ) यांना आमंत्रित केले होते. सोबत ब्लॉक चेन व आर्टिफिशियल इंटेलिजन्स मधील जागतिक दर्जाचे तज्ञ गौरव सोमवंशी, गव्हर्मेंट लायसनिंग क्षेत्रातील तज्ञ श्री सूरज तामगावे होते.
MACCIA चे अध्यक्ष रविंद्र माणगावे यांनी उपस्थित शेकडो उद्योजकांना मार्गदर्शन केले. चेंबरचे कार्य, भविष्यातील योजना व “गाव तिथे उद्योजक” अभियानाबद्दल माहिती दिली. उपस्थित सर्व उद्योजकांनी अभिनव उपक्रमाला उत्स्फूर्त पाठिंबा दर्शवला. महाराष्ट्र राज्य सरकार उद्योजकांसाठी जी काही पॅालिसी बनविते त्यात MACCIA चा महत्त्वाचे इनपुट्स नेहमीच असतात.
गौरव सोमवंशी सरांचे ब्लॉक चेन व आर्टिफिशियल इंटेलिजन्स या विषयचा तगडा अभ्यास असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच्या शपथविधीसाठी त्यांना बोलावून घेतले होते त्याचबरोबर शरद पवार, गौतम अदानी तसेच नरेंद्र मोदी यांच्यासारखे अनेक दिग्गज यांनी देखील या विषयाची सखोल माहिती घेण्यासाठी अनेक वेळा गौरव सोमवंशी सरांचा वेळ घेतलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये ब्लॉक चेन व आर्टिफिशियल इंटेलिजन्स चे महत्व व विशेष करून ट्रेसिबिलिटी या विषयावरती चर्चेचा उहापोह केला. एक्सपोर्ट करण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये हे तंत्रज्ञान अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे.
सूरज तामगावे सरांनी महाराष्ट्र राज्य तसेच भारत सरकारच्या वेगवेगळ्या उद्योजकांसाठी असलेल्या योजना यांची पीपीटी च्या माध्यमातून सखोल माहिती दिली.
MACCIA चे नवनिर्वाचित अध्यक्ष रविंद्र माणगावे साहेब तसेच गौरव सोमवंशी व सूरज तामगावे यांचा सत्कार सोहळा चाकण MIDC उद्योजक संघटना यांचे मार्फत करण्यात आला.
सदर प्रसंगी बोलताना चाकण MIDC उद्योजक संघटनेचे अध्यक्ष जयदेव अक्कलकोटे यांनी चाकण एमआयडीसी मधील संधी आणि समस्या मांडल्या. तसेच महाराष्ट्रातील सर्व चेंबर ऑफ कॉमर्सची शिखर संस्था असलेल्या MACCIA चे जास्तीत जास्त सदस्य बनविण्याचा मानस व्यक्त केला.
कार्यक्रमाची प्रस्तावना व सांगता चाकण MIDC उद्योजक संघटनेचे अध्यक्ष जयदेव अक्कलकोटे यांनी केली.












