- आ. शंकर जगताप यांच्या उपस्थितीत “प्रचंड मताधिक्याने” विजयाचा पॅनेलचा संकल्प…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
काळेवाडी (दि. ०३ जानेवारी २०२६) :- प्रभाग क्रमांक २६, वाकड-पिंपळे निलख-विशालनगर-कस्पटे वस्ती, वेणूनगर आदी भागातील भाजपच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ शनिवारी (सकाळी ११ वाजता) म्हातोबा मंदिर, वाकड गावठाण येथे करण्यात आला.
प्रचार प्रमुख आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते नारळ फोडून या प्रचार मोहीमेची सुरुवात झाली. आ. जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण पॅनेल प्रचंड मताधिक्याने विजयी होईल, असा विश्वास उमेदवारांनी व्यक्त केला.
शुभारंभप्रसंगी भाजपचे सचिन साठे, विशाल कलाटे, वसंत कलाटे, विठ्ठल कलाटे, बजरंग कलाटे, संपत विनोदे, मोहन भुमकर, आनंदा मानकर, तानाजी शेडगे, संभाजी कलाटे, सुरेश कलाटे, सोमनाथ काटे, बाळासाहेब कलाटे, राजाभाऊ मासुळकर, नंदुशेठ बालवडकर, पांडुरंग शेडगे, भगवान शेडगे, तानाजी शेडगे, शिवाजी आगळे, खंडू कलाटे, विष्णू कस्पटे, विजय कस्पटे, सचिन कलाटे, नितीन कलाटे, अमोल कलाटे, विनायक कलाटे, विजय कलाटे, उत्तम कलाटे, मनोहर कलाटे, गुलाब कलाटे, काळूराम कलाटे, दिलीप कस्पटे, रामदास कस्पटे, विकास कस्पटे, प्रसाद कलाटे, भाऊसाहेब कलाटे, विजय भुजबळ, सुरेश कळमकर, मारोती कलाटे, ज्ञानेश्वर कलाटे, सुरेश मानकर, ज्ञानेश्वर बुचूडे, साहेबराव कस्पटे, कैलास कस्पटे, विकास मानकर, मुकेश कस्पटे, सुनिल मानकर, सचिन लोंढे, सुदेश राजे, सागर कस्पटे, सम्राट मानकर, ओंकार कस्पटे, सुधीर कस्पटे, मंगेश मानकर, सुनील कस्पटे, बाबुराव कस्पटे, धनराज बिर्दा, मनोज कस्पटे, किशोर कस्पटे, बाप्पु कस्पटे, किरण कस्पटे, नरेंद्र बरडे यांच्यासह एकता ज्येष्ठ नागरिक मंडळ वाकडचे ग्रामस्थही सहभागी झाले होते.
महत्वाचा व झपाट्याने विकसित होणारा हा प्रभाग अधिक सुरक्षित आणि सुयोग्य विकासाच्या दृष्टीने भाजप पॅनेलला साथ देईल, असा विश्वास उमेदवारांनी व्यक्त केला. आ. जगताप यांनी मतदारांनी विकासाभिमुख पॅनेलला भरघोस मतदान करून निवडून द्यावे, असे आवाहन केले.
‘अ’ गटातील अॅड. विनायक गायकवाड, ‘ब’ गटातील आरती सुरेश चौंधे, ‘क’ गटातील स्नेहा रणजित कलाटे आणि ‘ड’ गटातील संदीप अरुण कस्पटे या उमेदवारांसह कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत फटाक्यांच्या आतषबाजीने जल्लोष करण्यात आला.
शुभारंभानंतर काढलेल्या पदयात्रेत म्हातोबा मंदिर — वाकड चौक — उत्कर्ष चौक — सम्राट चौक — वेणुनगर — कावेरीनगर — पिंक सिटी रोड — म्हातोबा चौक — छत्रपती चौक — धनराज पार्क असा मार्ग पार करत मानकर चौकात समारोप झाला. मार्गादरम्यान नागरिक आणि महिलांनी उमेदवारांचे औक्षण करून फुलांच्या वर्षावात जोरदार स्वागत केले.












