- राष्ट्रवादीला अनुकूल वातावरण झाल्याची मतदारांमध्ये चर्चा…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ०६ जानेवारी २०२६):- पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रहाटणी, तापकीरनगर, श्रीनगर परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसकडे मतदारांचा कल झुकताना दिसत आहे.
या प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार क) अनिताताई कैलास थोपटे यांच्याबरोबर ब) अश्विनीताई चंद्रकांत तापकीर, अ) सुमित रघुनाथ डोळस आणि ड) कोकणे सागर खंडूशेठ यांचा प्रचार जोमात सुरू आहे.
सोमवारी झालेल्या प्रचार फेरीत अनिताताई थोपटे यांनी अन्य उमेदवारांसह रहाटणी व शिवराजनगर भागात भेटी देत मतदारांशी संवाद साधला. प्रचारात पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
अनिताताई थोपटे म्हणाल्या, “प्रभाग स्वच्छ, सुरक्षित आणि सोयीस्कर बनवणे हेच आमचे ध्येय आहे. पाणीपुरवठा, रस्ते, दिवाबत्ती आणि सार्वजनिक सुविधा यांवर सातत्याने काम करू. येत्या १५ जानेवारीला नागरिकांनी मतदान करताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘घड्याळ’ चिन्हावर विश्वास दाखवून विकासाच्या बाजूने उभे राहावे.”












