- प्रभाग २७ मध्ये राष्ट्रवादीबाबत सकारात्मक वातावरण…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ०६ जानेवारी २०२६):- रहाटणी–तापकीरनगर–श्रीनगर या भागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी संधीचे वातावरण तयार होताना दिसते. बदल, स्थिर कामे आणि प्रचारशैली या तीन मुद्द्यांमुळे पक्षाविषयी सकारात्मक चर्चा वाढली असून प्रभाग क्रमांक २७ मध्ये राष्ट्रवादीकडे उत्सुकतेने पाहिले जात आहे.
या प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार ब) अश्विनीताई चंद्रकांत तापकीर यांच्यासह अ) सुमित रघुनाथ डोळस, क) थोपटे अनिता कैलास आणि ड) कोकणे सागर खंडूशेठ यांचा प्रचार जोरात सुरू आहे. सोमवारी झालेल्या प्रचार फेरीत अश्विनीताई तापकीर यांनी अन्य उमेदवारांसह रहाटणी आणि शिवराजनगर भागात घरभेटी देत मतदारांशी संवाद साधला.
अश्विनीताई तापकीर म्हणाल्या, “आपल्या प्रभागाला स्वच्छ रस्ते, नियमित पाणी, प्रकाश व्यवस्था आणि सुरक्षित सार्वजनिक सुविधा मिळाल्या पाहिजेत. यासाठी नियोजनबद्ध काम करणे हेच आमचे ध्येय आहे. प्रचारादरम्यान नागरिकांनी विविध अडचणी मांडल्या असून, त्यावर सकारात्मक तोडगे काढण्याचे आश्वासन देत येत्या १५ जानेवारीला मतदान करताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘घड्याळ’ चिन्हावर विश्वास ठेवा आणि विकासासाठी आपली साथ द्या.”












