- थेरगाव येथे खा. श्रीरंग बारणे यांच्या जनसंपर्क कार्यालयात प्रतिमेला पुष्पहार अर्पण…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
थेरगाव (दि. ०६ जानेवारी २०२६):- माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त थेरगाव येथील खासदार श्रीरंग बारणे यांच्या जनसंपर्क कार्यालयात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी मीनाताईंच्या कार्याचा उल्लेख करत त्यांना अभिवादन केले.
या वेळी जिल्हा प्रमुख राजेश खांडभोर, जिल्हा समन्वयक बाळासाहेब वाल्हेकर, जिल्हा संघटक संतोष सौंदणकर, युवासेना महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य रूपेश कदम, युवासेना जिल्हा प्रमुख सागर पाचारणे, पिंपरी विधानसभा प्रमुख सय्यद पटेल, जिल्हा संघटीका शीला भोंडवे, युवासेना जिल्हा संघटीका सायली सोनी यांच्यासह पिंपरी-चिंचवड परिसरातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
तसेच शारदा वाघमोडे, मीना डेरे, सुनिता चंदने, स्नेहा गायकवाड, तेजस्वी ढोरे, श्वेता कापसे, मिथिलेश शर्मा, परदेशी, आशा रॉय, सुनिता मोळक, सुप्रिया कावडे, सायली साळवी, शैला निकम, सुवर्णा तडसरे, दीपा जोगदंड आदींनीही उपस्थित राहून मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतीस आदर व्यक्त केला.












