- सह उमेदवार शुभांगी बोऱ्हाडे आणि तानाजी शिंदे यांच्यासह नागरिकांच्या गाठीभेटीवर जोर..
- थेट संवाद भीडतोय मतदारांच्या काळजाला..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १० जानेवारी २०२६) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १३ यमुनानगर–निगडी गावठाण येथे शिवसेना (एकनाथ शिंदे गट)च्या अधिकृत उमेदवार माजी नगरसेविका सुलभाताई रामभाऊ उबाळे यांच्या नेतृत्वाखाली प्रचार जोरात सुरू आहे. सहउमेदवार शुभांगी संजय बोऱ्हाडे आणि तानाजी हिरामण शिंदे यांच्यासह सुलभाताई उबाळे घरोघरी जाऊन नागरिकांशी थेट संवाद साधत आहेत.
प्रचारादरम्यान सुलभाताई उबाळे यांनी नागरिकांना धीर देत सांगितले की, “माझ्या प्रभागातील नागरिक म्हणजे माझं कुटुंब आहे. कुटुंबावर आलेलं कोणतंही संकट परतवून लावण्यासाठी तुमची ताई सर्वात पुढे ढाल बनून उभी राहील.” प्रभागातील प्रत्येक नागरिकाचं समाधान होईपर्यंत कोणताही प्रकल्प लादला जाणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.
“शब्द दिलाय, तर तो पाळणारच. विकासाच्या नावाखाली जनतेची दिशाभूल किंवा फसवणूक आम्ही खपवून घेणार नाही. खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचेही हेच स्पष्ट निर्देश आहेत,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
प्रचारादरम्यान अनेक नागरिकांनी, “ताई, मतं नका मागू… फक्त आमच्या यमुनानगरचं हरवलेलं गतवैभव परत द्या,” अशी भावना व्यक्त केली. यमुनानगरची आजची परिस्थिती बदलण्यासाठी आपण जीवाचे रान करू, असा शब्द देत सुलभाताई उबाळे म्हणाल्या की, “मी तुमच्या पाठीशी नाही, तर तुमच्या पुढे उभी आहे. जोवर मी आहे, तोवर तुमच्या घराला किंवा हक्काला कोणीही हात लावू शकत नाही.”
यमुनानगरचा चेहरामोहरा बदलून विकासाचे हरवलेले वैभव परत मिळवून देण्याचा निर्धार करीत त्यांनी मतदारांना अनुक्रमांक १ वरील उबाळे सुलभा रामभाऊ, ४ वरील बोऱ्हाडे शुभांगी संजय आणि अनुक्रमांक ६ वरील शिंदे तानाजी हिरामण यांच्या नावासमोरील ‘धनुष्यबाण’ या चिन्हाचे बटन दाबून या तिन्ही उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून देण्याचे आवाहन केले.












