- गाठीभेटींतून मतदारांशी थेट संवाद…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ जानेवारी २०२६) :- पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक २२ काळेवाडीमधून भाजपचे अधिकृत उमेदवार हर्षद सुरेश नढे यांनी प्रचाराला गती दिली आहे. “विकास, सुरक्षा आणि सांस्कृतिक अस्मिता जपणारे नेतृत्व देण्यासाठी भाजप सक्षम आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार विनोद जयवंत नढे, कोमलताई सचिन काळे, नीता पाडळे यांच्यासह शनिवारी झालेल्या प्रचारादरम्यान शिवभक्त नागरिक व हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांसह हर्षद नढे यांनी परिसरातील नागरिकांच्या गाठीभेटी घेतल्या. या भेटींमध्ये नागरिकांनी मूलभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा व सार्वजनिक सोयींबाबत अपेक्षा व्यक्त केल्या.
सायंकाळच्या प्रचार फेरीची सुरुवात अजिंक्य मित्र मंडळ, नढे नगर येथून झाली. या वेळी बाबासाहेब जगताप व मित्र परिवाराने प्रचार फेरीचे स्वागत केले. अजिंक्य कॉलनी, कांतीवीर कॉलनी व इतर सोसायट्यांमध्ये प्रचार करताना हर्षद नढे यांनी भाजपच्या विकासात्मक धोरणांची माहिती दिली.
येत्या गुरुवारी मोठ्या संख्येने कमळ चिन्हाला मतदान करून प्रभाग २२ मध्ये भाजपला बळकटी देण्याचे आवाहन त्यांनी केले.












