- काळेवाडीतील प्रचार फेरीत महिलांचा सक्रिय सहभाग…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
काळेवाडी (दि. ११ जानेवारी २०२६) :- प्रभाग क्रमांक २२ काळेवाडीमधून भाजपच्या अधिकृत उमेदवार कोमलताई सचिन काळे यांनी प्रभावी प्रचार करत महिलांचा विश्वास संपादन केला आहे. “महिला सक्षमीकरणासोबतच सांस्कृतिक वारसा जपणारा पक्ष म्हणजे भाजप,” असे मत त्यांनी प्रचारादरम्यान व्यक्त केले.
शनिवारी झालेल्या प्रचार फेरीत शिवभक्त नागरिकांसह महिलांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला. गाठीभेटी दरम्यान महिलांनी परिसरातील प्रश्न, सुरक्षितता आणि सोयीसुविधांबाबत आपली मते मांडली. कोमलताई काळे यांनी या प्रश्नांना प्राधान्याने सोडविण्याचे आश्वासन दिले.
सायंकाळी भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार विनोद जयवंत नढे, हर्षद सुरेश नढे, नीता पाडळे यांच्यासह अजिंक्य मित्र मंडळ, नढे नगर येथे प्रचार फेरीचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर अजिंक्य कॉलनी, कांतीवीर कॉलनी तसेच इतर सहा सोसायट्यांमध्ये प्रचार करत मतदारांशी संवाद साधण्यात आला.
येत्या गुरुवारी कमळ चिन्हाला मतदान करून प्रभाग क्रमांक २२ मधील भाजप उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन कोमलताई काळे यांनी केले.












