- नागरिकांसाठी विकासाचा सविस्तर अजेंडा जाहीर..
- या महत्वाच्या बाबींचा आहे समावेश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ जानेवारी २०२६) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूकीत प्रभाग क्रमांक २७ रहाटणी–तापकीरनगरमधील भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत महिला उमेदवार (‘क’) अर्चना विनोद तापकीर यांचा प्रचार सध्या जोरात सुरू असून, त्यांना प्रभागातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. प्रचारादरम्यान त्यांनी प्रभागातील नागरिकांसाठी विकासाचा सविस्तर अजेंडा जाहीर केला आहे.
अर्चना तापकीर यांनी सोसायटीतील मूलभूत सुविधा, सुरक्षितता, महिला सक्षमीकरण, विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करणारा विकास आराखडा मांडला आहे. हा अजेंडा प्रत्यक्षात उतरवण्यासाठी महापालिकेत ठोस पाठपुरावा केला जाईल, असे त्यांनी सांगितले.
अर्चना तापकीर यांचा विकासाचा अजेंडा पुढीलप्रमाणे :-
- सोसायटीच्या सुरक्षिततेसाठी प्रवेशद्वारावर सीसीटीव्ही कॅमेरे.
- अपघात टाळण्यासाठी सोसायटीजवळ स्पीड ब्रेकर.
- प्रत्येक सोसायटीसाठी २ इंची पाणीपुरवठा पाईपलाईन.
- पीसीएमसीच्या माध्यमातून सोसायटी परिसरात ओपन जिम.
- ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्याची स्वतंत्र व्यवस्था.
- विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन सेमिनार.
- पालकांसाठी मार्गदर्शन शिबीर.
- सोसायटीमध्ये कचरा संकलन व व्यवस्थापन अधिक सोपे करणे.
- राज्य व केंद्र सरकारच्या अनुदानातून सौर पॅनेल बसवून वीज बिल कमी करणे.
- महिला सक्षमीकरणासाठी कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम.
- शिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रम.
- विविध संगणक अभ्यासक्रम.
- मोफत शिलाई वर्ग.
- बेकरी व ब्युटीशियन प्रशिक्षण अभ्यासक्रम.
- नागरिकांसाठी मोफत वैद्यकीय शिबिरे.
या विकास अजेंड्याच्या माध्यमातून प्रभाग २७ अधिक सुरक्षित, सुसज्ज व सक्षम करण्याचा आपला संकल्प असल्याचे अर्चना तापकीर यांनी सांगितले. येत्या गुरुवारी मतदान केंद्रात अनुक्रमांक १ अर्चना विनोद तापकीर नावासमोरील ‘कमळ’ चिन्हाला मोठ्या संख्येने मतदान करून विजयी करण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे.












