- ‘घड्याळ’ चिन्हाला मतदान करून भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
रहाटणी (दि. ११ जानेवारी २०२६) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २७ तापकीरनगर–रहाटणी–श्रीनगर परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार अश्विनी चंद्रकांत तापकीर यांना नागरिकांचा वाढता पाठिंबा मिळत असल्याचे चित्र दिसत आहे. विशेषतः रहाटणी परिसरातील विविध सोसायटीधारकांनी व्यक्त केलेल्या पाठिंब्यामुळे त्यांच्या विजयाची शक्यता प्रभागातील नागरिकांकडून बोलून दाखवली जात आहे.
प्रचारादरम्यान अश्विनीताई तापकीर यांनी सोसायटीधारक, महिला, ज्येष्ठ नागरिक व तरुण मतदारांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या व अपेक्षा जाणून घेतल्या. पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, सुरक्षितता, तसेच मूलभूत नागरी सुविधांबाबत त्यांनी मांडलेली भूमिका नागरिकांना भावल्याचे दिसून येत आहे. “प्रभागातील प्रत्येक घटकाचा समतोल विकास हाच माझा उद्देश आहे,” असे त्यांनी यावेळी सांगितले.
रहाटणी व तापकीरनगर परिसरातील अनेक सोसायट्यांमध्ये झालेल्या गाठीभेटींमध्ये नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत अश्विनीताई यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास व्यक्त केला. विकासकामांचा अनुभव, सातत्यपूर्ण जनसंपर्क आणि स्थानिक प्रश्नांची जाण यामुळे त्या प्रभागासाठी योग्य उमेदवार असल्याचे मत अनेक नागरिकांनी व्यक्त केले.
येत्या गुरुवारी दि. १५ जानेवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीत ‘घड्याळ’ चिन्हाला मतदान करून भरघोस मतांनी निवडून द्या, असे आवाहन अश्विनी चंद्रकांत तापकीर यांनी प्रभागातील नागरिकांना केले आहे.












