न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १२ जानेवारी २०२६) :- निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आल्याने प्रभाग २६ मधील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार ॲड. विनायक गायकवाड, आरती चोंधे, स्नेहा कलाटे, संदीप कस्पटे या उमेदवारांनी रविवारच्या सुट्टीचा दिवस गाठत अक्षरशः प्रभाग पिंजून काढला त्यामुळे सर्वच स्तरावर भाजपा पॅनलने निर्णायक आघाडी घेतल्याचे चित्र आहे.
उमेदवारांनी रविवारच्या सुट्टीचे निमित्त साधत हाऊसिंग सोसायट्यांमध्ये बैठका घेत मतदारांशी थेट संवाद साधला. यावेळी कार्यकर्त्यांनी विजयाच्या जोरदार घोषणा केल्या.आयोजित बैठकांमध्ये सोसायटीधारकांनी उत्साहात सहभाग नोंदवला. जनतेचा उत्साह आणि प्रतिसाद पाहता आमच्या पॅनलचा विजय निश्चित आहे, असा विश्वास उमेदवारांनी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या स्वप्नातील विकासाचे व्हिजन प्रत्यक्षात उतरविण्यासाठी बहुमताने भाजपच्या पॅनलला विजयी करण्याचे आवाहन यावेळी कारण्यात आले.
दौऱ्या दरम्यान बेला विस्टा, माउंटवर्ट ओयस्टेरा, प्रेस्टिन ग्राईनडर, सुकासा, आर के लाईफ स्पेस, नंदन इम्परिया, कोस्टा रिका, कॅप्रिसिओ, माउंट वर्ट सिव्हिल, लॉरेल, कॅलीस्टो, मी कासा बेला, ओझोन स्प्रिंग या सोसायट्यांमध्ये बैठका पार पडल्या. यावेळी कार्यकर्त्यांनी मतदान यंत्राद्वारे कशाप्रकारे मतदान करायचे याचे प्रात्यक्षिक दाखवले. यावेळी शंकाचे निरसन करण्यात आले. चारही उमेदवारांनी आपल्या प्रभागाच्या सर्वांगीण विकासाचे अभिवचन देत. जाहिरनामा प्रसारित केला.
- उमेदवारांनी सादर केला विकासाचा रोडमॅप…
– अतिक्रमणमुक्त पदपथ आणि रस्ते
– प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी हरितकरण
– प्रभागाची स्वच्छता आणि सुशोभीकरणावर भर
– मुबलक आणि पुरेशा दाबाने पाणीपुरवठा
– काळेवाडी फाटा परिसरातील आरक्षण विकसित करून त्या ठिकाणी खेळाचे मैदान, उदयान, विरंगुळा केंद्राची उभारणी
– सांस्कृतिक भावनाचे नियोजन
– नदीसुधार प्रकल्प राबविण्याला प्राधान्य
– मेट्रो प्रकल्पासाठी विशेष प्रयत्न
– नागरी सुरक्षिततेला प्राधान्य
– वाहतूक आणि कचरा व्यवस्थापनाची प्रभावी अंमलबजावणी
– खड्डेमुक्त रस्त्यांसाठी आग्रही
– भाजी मंडई विकसित करणार
कुणाचीही हयगय केली जाणार नाही…
सामाजिक कार्यकर्ते सचिन साठे प्रचार दौऱ्यात सहभागी झाले होते. त्यांनी मतदारांना संबोधित करत पदपथ आणि रस्त्यांवर अतिक्रमण करणाऱ्यांची हयगय केली केली जाणार नाही. नागरिकांचे जीवन सुकर आणि सुसह्य होण्यासाठी सर्वतोपरी ठोस प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिले.
गेल्या दोन दिवसात उमेदवारांनी भेट दिलेल्या सोसायट्यांची नावे :-
निसर्ग क्लासिक, राधिका एन्क्लेव्ह, कास्प काउंट्री, निसर्ग एक- दोन, फ्लोरेंशिया, अनमोल रेसिडेन्सी, साई कॅलिस्टा, संस्कृती सोसायटी, कल्पतरू सोसायटी, ग्रीन व्हॅली, सोनिगरा लॉरेन, वेस्ट वूड, ऑस्टिन प्लाझा, विंडवार्ड्स सोसायटी, दक्षतानगर, निसर्गसृष्टी, महालक्ष्मी, विसलिंग पाम, निसर्गपूजा, सोनिगरा होम्स, वर्धमान रेसिडेन्सी, निसर्गदीप, नंदादीप, धनराज पार्क, ऐश्वर्या रेसिडेन्सी आदी सोसायटीधारकांशी संवाद साधला.












