न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १२ जानेवारी २०२६) :- क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फॉउंडेशन संचलित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूल रहाटणी येथे विवेकानंद जयंती व राजमाता जिजाऊ जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी शाळेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार, शाळेचे उपमुख्याध्यापक सचिन कळसाईत व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी शाळेतील पालक उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात पालक रिंकू सिंह व शिक्षक यांच्या हस्ते पूजा करून करण्यात आली.
स्वराली शिंदे, यशश्री भोसले, वंशिका तसेच सोहम हिरवे या विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जीवनकार्यावर प्रेरणादायी भाषणे सादर केली. त्यांच्या भाषणांमधून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, राष्ट्रभक्ती व चारित्र्यनिर्मितीचे महत्त्व अधोरेखित झाले.
कार्यक्रमात इंग्रजी भाषण स्वामी विवेकानंद यांच्या जीवन व कार्यावर सरिका मॅडम यांनी केले. मराठी भाषण राजमाता जिजाऊ यांच्या प्रेरणादायी जीवनावर अनिता मॅडम यांनी सादर केले. तसेच हिंदी भाषण सादरीकरण गीतांजली मॅडम यांनी केले, ज्यातून विद्यार्थ्यांना शिस्त, धैर्य व देशप्रेमाचे महत्त्व पटवून देण्यात आले.
रिंकू सिंह यांनी आपल्या मनोगतात स्वामी विवेकानंद यांच्या विचारांपासून तसेच राजमाता जिजाऊ यांच्या आदर्श जीवनातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी, हा या कार्यक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन अनिता रोडे मॅडम यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतलेल्या सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांचे त्यांनी मनःपूर्वक आभार मानले.












