- शिवसेना उपनेते इरफानभाई सय्यद यांच्या उपस्थितीत स्वराज संकल्पक राजमाता जिजाऊ आईसाहेब जयंती उत्सहात साजरी..
न्युज पीसीएमसी नेटवर्क
चिंचवड (दि. १२ जानेवारी २०२६) :- स्वराज्याच्या संकल्पनेला आकार देणाऱ्या, छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या महान योद्ध्याला घडविणाऱ्या स्वराज संकल्पक राजमाता जिजाऊ आईसाहेब यांची जयंती शिवसेना उपनेते मा. इरफानभाई सय्यद यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
हा कार्यक्रम महाराष्ट्र मजदूर संघटना कार्यालय, जिजामाता मार्केट, शाहूनगर, चिंचवड, पुणे येथे दि. १२ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता पार पडला.
यावेळी राजमाता जिजाऊ आईसाहेब यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमास शिवसेना उपनेते तथा महाराष्ट्र मजदूर संघटनेचे संस्थापक/अध्यक्ष मा. इरफानभाई सय्यद, संघटनेचे जन. सेक्रेटरी प्रवीण जाधव श्री. दीपक पालांडे, श्री. पिंजरकर काका, श्री. पांडुरंग गव्हाणे, श्री. सुनील पाडाळे, श्री. पारवे काका, श्री. पांडुरंग कदम, दादा कदम, नागेश व्हनवटे यांच्यासह संकेत चावरे, समर्थ नाईकवाडे, बबन काळे, अमित पासलकर, गणेश नाईकवाडे, आयुष शिंदे, रतन भोजने तसेच संघटनेचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना मा. इरफानभाई सय्यद म्हणाले की, “राजमाता जिजाऊ आईसाहेब यांनी दिलेले संस्कार, स्वराज्याची जाणीव, समाजासाठी झटण्याची प्रेरणा आजही आपल्यासाठी दीपस्तंभ आहेत. त्यांच्या विचारांवर चालत कामगार, सामान्य जनता व समाजाच्या हितासाठी संघर्ष करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.”
कार्यक्रम शांततापूर्ण व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.












