अशोक लोखंडे :- संपादक तथा प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १५ जानेवारी २०२६) :- मतदानाच्या दिवशी मतदारांना अडचण येऊ नये यासाठी निवडणूक आयोगाने ओळखपत्रांबाबत स्पष्ट मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. मतदार छायाचित्र ओळखपत्र नसले तरी आयोगाने मान्य केलेल्या १२ पैकी कोणतेही एक ओळखपत्र सादर करून मतदान करता येणार आहे.
यामध्ये पासपोर्ट, वाहनचालक परवाना, पॅनकार्ड, आधारकार्ड, बँक पासबुक, निवृत्तीवेतन ओळखपत्र, शासकीय कर्मचाऱ्यांचे ओळखपत्र, खासदार किंवा आमदार ओळखपत्र यांचा समावेश आहे. ओळखपत्रावर छायाचित्र असणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
मतदान केंद्रावर ओळख पडताळणी केल्यानंतरच मतदारांना मतदानाची परवानगी दिली जाणार आहे. त्यामुळे मतदारांनी योग्य ओळखपत्र सोबत ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
मतदान प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी प्रशासन सतर्क असून कोणतीही गैरप्रकार आढळल्यास तातडीने कारवाई केली जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.












