- अहिर सुवर्णकार समाज चॅरिटेबल ट्रस्ट पिंपरी चिंचवड कडून २६ जानेवारी निमित्ताने स्नेहसंमेलन कार्यक्रम उत्साहात संपन्न..
- विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसह गुणवंत व समाजातील मान्यवरांचा सन्मान…
मा. अशोक लोखंडे :- संपादक तथा प्रतिनिधी….
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ३० जानेवारी २०२६) :- समाजातील ऐक्य आणि सांस्कृतिक परंपरा जपण्याच्या उद्देशाने पिंपरी चिंचवडच्या अहिर सुवर्णकार समाज चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सोमवारी २६ जानेवारी रोजी प्रभू रामचंद्र सभागृह चिंचवड येथे स्नेहसंमेलन आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
कार्यक्रमात समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा प्रमुख पाहुण्या शिवसेना उपनेत्या तथा नगरसेविका सुलभाताई उबाळे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी ‘जीवन गौरव’ पुरस्कार सुरेश विसपुते यांना तर, ‘समाजभूषण’ पुरस्कार सुनील निकुंभ, उद्योगरत्न पुरस्कार माधवी सोनार आणि ‘कलाविष्कार’ पुरस्कार रेखा अहिरराव यांना प्रदान करण्यात तर “विद्याभूषण” कु.अनन्या योगेश अहिरराव व “विद्या विभूषणकु” कु.स्वाती शैलेश भामरे यांना देण्यात आला. यासह कार्यक्रमात होम मिनिस्टर खेळ, सांस्कृतिक सादरीकरणे, चित्रकला स्पर्धा तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
उपस्थितांना मार्गदर्शन करताना नगरसेविका सुलभाताई उबाळे यांनी समाजातील प्रतिष्ठीत नागरिक विविध क्षेत्रात कार्यरत असले तरी, दरवर्षी नित्यनेमाने २६ जानेवारीला एकत्र येऊन कार्यक्रमात सहभागी होतात, याबाबत कौतुक केले. समाजातील एकोपा आणि युवकांच्या सहभागामुळे अशा कार्यक्रमांना अधिक बळ मिळते, असे सांगत समाजाच्या प्रगतीसाठी एकत्र काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.
संतोष सौंदणकर यांनी आपल्या मनोगतात समाजातील परंपरा, एकजूट आणि युवकांना योग्य दिशा देण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे अधोरेखित केले.
कार्यक्रमाचे आयोजन अहिर सुवर्णकार समाज चॅरिटेबल ट्रस्टचे, अध्यक्ष भगवान वानखेडे, सचिव गणेश सोनार, खजिनदार शिवाजी सोनार, उपाध्यक्ष प्रवीण सोनार, संतोष सौदणकर, महिला प्रमुख स्मिता सोनार, सहखजिनदार कैलास पैठणकर, भुवन प्रमुख प्रमोद काशीकर, सभासद दीपक सोनार, सुनील निकुंभ, प्रवीण दुसाने, अनिता सोनार, राहुल सोनार, प्रफुल्ल आहिरराव, अमोल अहिरराव, शशिकांत बागुल, निलेश निकुंभ प्रीती आहिरराव, पूजा बागुल, प्रियांका सोनार यांनी केले होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर चव्हाण, रेखा अहिरराव यांनी तर आभार प्रदर्शन संतोष सौंदणकर यांनी केले.












