संतोष जराड, प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ३ फेब्रुवारी २०२६) :- रावेत येथे पिंपरी चिंचवड श्री वैश सुतार पुणे चॉरिटेबल ट्रस्टच्या वतीने श्री विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सृष्टीचा सर्जनहार प्रभू श्री विश्वकर्मा यांच्या प्रतिमेचे पूजन अंकित व खुशबू वाजा, सागर व तेजल सुद्रा, अग्नीक व मीरा काटेलिया यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून प्रतिमेचे विधीपूर्वक पूजन भक्तिमय वातावरणात करण्यात आले.
श्री विश्वकर्मा जयंती निमित्त भक्ती गीत, अन्नदान, रास गरबा आणि विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जयंतीचे नियोजन व संयोजन ट्रस्टचे अध्यक्ष मुकेश चुडासमा यांनी केले.
यावेळी लालजी चुडासमा, प्रवीण वाढीया, सुधीर वाजा, रमेश पडियाळ, प्रतीक सुद्रा, बाबू गोढानिया, जया वाढीया, भानू चूडासमा, वैशाली गोढानिया, भूमी सुद्रा, भारती वाढीया, हर्षा वाजा आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.












