सुरज करांडे, प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
तळेगाव दाभाडे (दि.२४ फेब्रुवारी २०२६):- तळेगाव दाभाडे येथे जुना पुणे-मुंबई महामार्ग, सीआरपीएफ गेट क्रमांक ३ समोरील परिसरात एक महिला आरोपी सार्वजनिक ठिकाणी अश्लील हावभाव करून येणाऱ्या-जाणाऱ्यांना अडथळा निर्माण करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे पोहवा उदयकुमार भोसले यांनी तक्रार दाखल केली.
घटनेनंतर परिसरात गस्त वाढविण्यात आली असून अशा प्रकारांवर कडक कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
याप्रकरणी गुन्हा नोंद झाला असून पुढील तपास पोहवा तोडकर करीत आहेत.











