सुरज करांडे, प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
सांगवी (दि.२४ फेब्रुवारी २०२६):- इंस्टाग्रामवर रिल्स पाहत असताना ‘C-360 ONE Insight Exchange Group’ या व्हॉट्सअॅप ग्रुपवर जोडले गेले.
आरोपींनी ‘360 ONE HNW’ अॅप डाउनलोड करून आकर्षक परताव्याचे आमिष दाखवत टप्प्याटप्प्याने गुंतवणूक मागितली.
सुरुवातीला बनावट नफा दाखवून विश्वास संपादन केला व नंतर एकूण ३०,७०,६०६ रुपये विविध बँक खात्यांत भरायला लावले. परतावा न देता संपर्क तोडल्याने फसवणूक उघडकीस आली.
सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. वपोनि कोळी तपास करत असून आरोपी अटक नाहीत.











